नवाज सुध्दा मराठी चित्रपटांच्या प्रेमात

 

मराठी चित्रपट आता सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. कोर्ट, किल्ला, नटसम्राट आणि आताचा सैराट यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नाव मोठं केलं आहे. आपल्या मराठी चित्रपटाला बॉलिवूडकडून आदर मिळतोय. सध्या भारतात मराठी चित्रपटांचा बोलबाला आहे.  

सुरुवातीला मराठी सिनेमा आशयप्रधान होताच पण आता त्या आशयप्रधान सिनेमांना आर्थिक दृष्टिकोन पण लाभला आहे.  अमिताभजी बच्चन यांच्यापासून ते आमिर खान व अनुराग कश्यप पर्यंत तसेच इतर कलाकार व व्यक्ती या सर्वांकडून मराठी चित्रपट, कथा यांविषयी कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात. एवढंच नव्हे तर बॉलिवूड व इतर प्रादेशिक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीदेखील मराठी चित्रपट बनवू इच्छितात.

मराठी चित्रपटाचं कौतुक आणखी एका बॉलिवूड कलाकाराने केलयं, तो कलाकार म्हणजे नवाजउद्दीन सिध्दीकी. नुकत्याच एका मुलाखतीत नवाजउद्दीन सिध्दीकी म्हणाला, “ सध्या मराठी सिनेमा जगाच्या कुठल्याही सिनेमाविषयी कमी नाही आहे.”


अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रमन राघव २.०’ हा नवाजउद्दीन सिध्दीकीचा आगामी चित्रपट येत आहे. नवाजच्या या वक्तव्यावरुन त्याचे मराठी फॅन्सही त्याचे काम पाहायला उत्सुक होतील.