रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे यांचा ‘जल्लोष प्रेमाचा’

 

महाराष्ट्र दिन, मराठी बाणा आणि या सगळ्यात गुंग झालेली मराठमोळी तरुणाई हे चित्र आपल्याला  महाराष्ट्रभरात ‘महाराष्ट्र दिना’निमित्त नेहमीच दिसून येते. आजही आधुनिक होत असलेला तरुण आपली मूल्ये जपतो. सणवार तेवढ्याच प्रेमाने साजरे करतो.

दिसण्यात आधुनिक असलेल्या तरुणीही असे सण आल्यावर आपल्याला नऊवारीत दिसतात. झी युवाचा प्रेक्षक असलेला असा हा तरुण आधुनिक आहेच पण तेवढाच पारंपरिक सुद्धा. महाराष्ट्र दिनानिमित्त ‘प्रेम हे’ ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे ‘जल्लोष प्रेमाचा’ 

येत्या सोमवारी १ मे च्या निम्मिताने एक मराठमोळी गोष्ट  झी युवा आपल्यासाठी घेऊन येत आहे. हा महाराष्ट्र दिनानिमित्त असलेला विशेष भाग सोमवार मे आणि मे ला रात्री वाजता रुचिरा जाधव  आणि अक्षय वाघमारे  यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस अस्सल मराठमोळी  प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

मुक्ता जहागीरदार आणि विक्रांत मोहिते या दोघांची ही अस्सल मराठमोळी कहाणी. मुक्ता जी अतिशय मॉडर्न पण भरपूर समंजस तर विक्रांत हा भारतीय संस्कृतीत रुतलेला, कणखर पण तेवढाच स्वभावात मृदू असा एक रांगडा मराठी मुलगा.

या प्रेमकहाणीत दोन भिन्न विचारांची लोक जेव्हा एकमेकांना न समजता गैर समज करतात आणि मग चूक समजताच तेवढ्याच उत्कटतेने एकमेकांवर प्रेम करायला लागतात. पण त्यांचे हे प्रेम त्यांना मिळते का? नक्की काय गैरसमज होतात. महाराष्ट्र दिन त्यांच्यासाठी नक्की काय घेऊन येतो ? हे पाहण्यासाठी जल्लोष प्रेमाचा पाहावेच लागेल. 

‘जल्लोष प्रेमाचा’ ही झी युवाची संकल्पना असून रुचिरा जाधव आणि अक्षय वाघमारे  हे मुख्य भूमिकेत आहेत, तर स्वप्नील गांगुर्डे यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांनी केले आहे.