सागरिका आणि झहीर खान......?

 

डिसेंबर महिना आला की सगळीकडे सनई चौघडे, लग्नाची घालमेल चालू असते. त्यात यावर्षी मुहूर्त खूप असल्यामुळे सर्वत्र लग्नीनघाई दिसून येत आहे. राजकरण्यापासून ते खेळाडूपर्यत तर कलाकारापासून ते सामान्य जनतेपर्यंत सगळीकडे एकच चर्चा आणि ती म्हणजे लग्न. सर्वत्र सनई-चौघडे वाजू लागले आहेत, मेंहदी काढण्यासाठी अनेक तरुणींची आणि  घरातील सजावटीसाठी नातेवाईकांची, मित्र-मैत्रीणीची घाई-घडबड सुरु आहे 

.

ऐन लग्नसराईत मात्र 500 1000 च्या नोटांवर बंदी आणली गेली असली तरी त्याचा फरक सामान्य लोकांना सोडून कोणाला पडलेला दिसत नाहीये...असो

होणार तुझं लगीन होणार.. असं म्हणता म्हणता सध्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकत आहेत.  नुकतेच कलाकार कांदबरी कदम- अविनाश अरूण, श्रुती मराठे- गौरव घाटणेकर, पल्लवी पाटील-संग्राम समेळ, मृण्मयी देशपांडे- स्वप्नील राव, आणि अतुला दुग्गल- सिद्धव नाचणे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीत एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल पाच जोड्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. 

अजून एक गोष्ट म्हणजे कलाकारांबरोबरच नुकतेच युवराज सिंग या क्रिकेटरचं सुद्धा मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पाडलं. मुंबईसह त्यांनी गोव्यात देखील हिंदू पद्धतीने लग्न पार पाडलं. त्यावेळी बरीच कलाकार मंजळी तिकडे उपस्थितीत होती. दरम्यान क्रिकेटपटू झहीर खान आणि प्रेमाची गोष्ट या सिनेमातून मराठीत पदार्पण केलेली अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं सुद्धा त्यावेळी तिकडे एकत्र उपस्थितीत होते.

संपूर्ण सोहळ्यात युवराज- हेजल बरोबर झहीर खान आणि सागरिका घाटगे या जोडीवर ही अनेकांची नजर गेली आहे. सोशल मिडीयावर या जोडीचे फोटोज शेयर झाल्यानंतर असं समजण्यात आलय की युवराज नंतर झहीर खान सुद्धा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. सागरिका घाटगे बरोबरच की अजून दुसरं कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे.