दादा कोंडके यांच्या जीवनावरील सिनेमा पुढे ढकलला

 

मराठी सिनेसृष्टीतील विनोदांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दादा कोंडके. विनोदांची खास शैली, गावरान भाषा आणि हावभाव याबाबत तर त्यांची बातच काही निराळी. सर्वांना खळखळून हसवून मनोरंजन करण्यात दादांचे सिनेमे प्रसिध्द. म्हणूनच या अवलियाला आदरांजली म्हणून दादांच्या जीवनपट उलगडणारा सिनेमा दिग्दर्शक संजय जाधव करणार होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी हा सिनेमा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

सिनेमासाठी ‘दादा’ हे शिर्षकसुध्दा निश्चित करण्यात आलं. स्वप्नील जोशी आणि कॉमेडी किंग गोविंदा यांच्या नावाचा विचार दादांच्या भूमिकेसाठी यापूर्वी करण्यात आला. तसंच अभिनेत्री उर्मिला कानेटकरची उषा चव्हाण य़ांच्या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली होती. स्वप्निल जोशी सध्या दोन सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने दादांचा सिनेमा पुढे ढकलल्याची चर्चा आहे.