EXCLUSIVE: अभिनयाच्या दिग्गजांसोबत दिसणार संस्कृती

 

‘शॉर्टकट’ या मराठी चित्रपटानंतर अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज घेऊन येत आहे.  संस्कृतीला परत मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही. 

लवकरच संस्कृती बालगुडे आपल्याला एका नव्याको-या कलाकृतीतून भेटायला येत आहे.  संस्कृतीसोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मेघना एरंडे, वंदना गुप्ते, किशोर कदम यांच्यासारखी दिग्गज मंडळी सुध्दा आहेत.  या सगळ्यांबरोबर संस्कृतीची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहण्यास आपण सारे उत्सुक आहोत. 

अद्याप चित्रपटाच्या नावाबद्दल अजून सांगण्यात आलेली नाही.  पण त्याविषयाची अधिक माहिती मराठी धमाल डॉट कॉम तुमच्यासाठी घेऊन येईल.