श्रेयसची आता मालिकेत बाजी

 

अभिनेता श्रेयस तळपदे आता छोट्या पड़्यावर बाजी मारतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार प्रवाहावरील आगामी मालिकेची निर्मिती श्रेयस तळपदे करतोय.

काही वर्षांपूर्वी गाजलेल्या 'अवंतिका', 'बेधुंद मनाची लहर' या मालिकांमध्ये श्रेयसने भुमिका साकारल्या आहेत. तसेच ‘झुंज मराठमोळी’ या रिएलिटी शोचं सूत्रसंचालनसुध्दा त्याने केलंय.

हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मराठीत ‘सनई चौघडे’, ‘पोश्टर बॉईज’ या हिट सिनेमांची निर्मिती श्रेयसने केली. सिनेमाच्या निर्मितीनंतर आता श्रेयस मालिकांकडे वळतोय हे पाहणं औत्युक्याचं ठरतंय.