सिद्धार्थ चांदेकरची ‘MovieDate’ ?

 

मराठी सिनेसृष्टीतला हॅडसम हंक म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ चांदेकर गेले काही दिवस सोशल मिडियावरून चर्चेत आला आहे. इनस्टाग्रामवरील एका पोस्टमुळे पूर्ण खळबळ उडाली आहे.

नुकताच सिद्धार्थ चांदेकरने ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील खलनायिकेची भूमिका साकारलेली  शनाया म्हणजेच रसिका सुनिल हिच्या सोबतचा एक फोटो इनस्टाग्रामवर शेयर केला आहे. या दोघांच्या फोटोमुळे नुसती चर्चाच जणू सुरू झाली आहे. बरं नुसता फोटो नाही तर त्या फोटोखाली #MovieDate म्हणून असं हॅशटॅगही दिलं आहे. या दोघांचा प्रचंड फॅनक्लब असल्यामुळे कित्येक तरूणांचे आणि तरूणीचे हार्ट ब्रेक झालेले दिसत आहे.

या अगोदर देखील त्याने महिलादिनादिवशी देखील एक फोटो शेयर केला होता. त्यात त्याने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीचे फोटो शेयर केले आहे. त्यात रसिका देखील आहे.

आता खरच ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत की फक्त चांगले मित्र आहेत नक्की काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. पण हे जर खरं असेल तर लाखो तरूणाईचे हार्ट ब्रेक होतील एवढं खरे.