आपला सिध्दू ‘तसला’ नाही

 

काही दिवसांआधी आपण असं ऐकलं होतं की अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये वाद झाले होते. अक्षय सिध्दार्थवर चिडला होता.

नक्की झालं काय होतं ते आता आपण पाहूया-

कॉमेडी नाईट्स बचाओ या शोमध्ये हाऊसफुल ३ चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस आले होते. त्यावेळी त्यांची टेर खेचत लिझा हेडनवर ऑस्ट्रेलियातील कांगारुवरुन जोक करण्यात आले. ज्यामुळे लिझा आणि जॅकलिकन अस्वस्थ होते. यामुळे अक्षय कुमार सिध्दार्थवर चिडला.

हा सगळा गैरमसज होता हया गोष्टीचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चनने केला आहे. हा कॉमेडी शो आमच्या टीमची टेर खेचत होता तर आमची टीम त्यांची टेर खेचत होती, हा संपूर्ण मजाक-मस्तीचा प्रसंग होता. कोणी कोणावर चिडलं नाही. असं अभिषेक बच्चन म्हणाला.

हा केवळ गैरसमज होता असं समजूयात. आपला सिध्दू चुकीचं असं काहीच वागणार नाही, हे त्याच्या सर्व फॅन्सना माहित आहे.