सनी लिओन मराठी सिनेमात ?

 

सनी लिओन मराठीत......वाचून धक्का बसला ना ! पण हे खरं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘शाळा’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाके ‘आजोबा’ आणि फुंतरू नंतर आता एक अॅडल्ट विषय हाताळतोय. वर्षभराच्या ब्रेकनंतर ‘वल्गर अॅक्टीव्हीटीज इनकॉर्प’ या नव्या सिनेमाच्या कथेवर त्याचं काम सुरू आहे. या सिनेमाच्या भूमिकेसाठी सनी लिओनला घेण्याचा विचार सुजयने नक्की केलाय.

‘वल्गर अॅक्टीव्हीटीज इनकॉर्प’ या सिनेमातील सनीच्या भूमिकेविषयी सुजयने सनीचे पती डॅनियल वेबर यांच्या बरोबर नुकताच संपर्क साधलाय. तसेच अश्लीलतेचं विश्व उलगडणा-या या सिनेमाची स्क्रीप्टही ई-मेल केली आहे. विषयानुरूप हा सिनेमा इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लीश भाषेत करण्याची सुजयची तयारी आहे.

सनी आणि पती डॅनियल सध्या सुट्टीवर आहेत. सुट्टीवरून परतल्यावर या सिनेमाबाबत ते सुजयला कळवतील. पण सनीने या सिनेमासाठी नकार दिला तर मात्र दुस-या अभिनेत्रीला घेऊन हा सिनेमा करण्यात सुजयला फार उत्सुकता नाही.

सनीबाई बॉलीवूडमध्ये ब-याच व्यस्त आहेत. त्यामुळे सनीच्या होकारावर आणि वेळेच्या गणितावर  सिनेमाचं भविष्य अवलंबून असल्याचं दिसतंय.