‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ मराठीत बनणार?

 

नुकतेच, सोनी पिक्चर्स इंडिया आणि मारवेल स्टुडियोज यांनी ‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित केला.

‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ या चित्रपटाचा  ट्रेलर १० भारतीय भाषेत डब होणार आहे आणि त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा पण सहभाग आहे. अनेकांसाठी ही अभिमानाची बाब नक्कीच असेल. सोनी पिक्चर्स इंडिया यांनी या चित्रपटाचा मराठी भाषेतील ‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. मराठी डब ट्रेलरला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे आणि संपूर्ण चित्रपट पाहण्याची उत्सुकता पण त्यांच्यात नक्कीच वाढली असेल. परंतु हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मराठी सिनेनाट्यसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकरने पण ‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ चा मराठी ट्रेलर पाहून ट्विटर या सोशल साईटवरुन आपली प्रतिक्रिया कळवली-

पाहा ‘स्पायडर- मॅन: होमकमिंग’ चा मराठी ट्रेलर-

[removed][removed]