प्रार्थनाची मॉरिशसवारी

 

 

मॉरिशस म्हटलं की डोळ्यासमोर निळाशार समुद्र आणि मस्त सुट्टी एन्जॉय करणं इतकचं दिसतं. पण प्रार्थना इथे आपली सुट्टी एन्जॉय करतेय असा समज बिलकूल करू नका, कारण ती इथे सिनेमाच्या शूटिंगसाठी आली आहे

‘मितवा’, ‘कॉफी आणि बरचं काही’, ‘तुझ्या विन मरजावा’ यांसारखे हिट सिनेमे देणारी प्रार्थना बेहरे आता मॉरिशसला जाऊन पोहचलीय. सोशल नेटवर्किंग साईटवर प्रार्थनाने मॉरिशस बीचवरील फोटो शेअर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रार्थना ‘कॉफी आणि बरचं काही’ सिनेमातील आपला सहअभिनेता वैभव तत्ववादीसोबत मॉरिशसमध्ये शूट करतेय.या दोघांची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. अद्याप तरी या सिनेमाबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.

मराठी सिनेमा आता सर्वार्थाने साता समुद्रापार जाऊन पोहचलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही.