स्पृहा-गश्मीर-समीर विद्वांस यांचा एकत्र नवीन प्रोजेक्ट?

 

‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातील अभिनेता, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि कवयित्री यांनी एकत्रित काम केले तर प्रेक्षकांना ही नवीन जोडी पाहायला मिळेल. प्रेक्षकांना नवीन जोडी, कथा नेहमीच पाहायला आवडतं.

वरील चित्रपटांच्या नावांवरुन आणि कवयित्री या शब्दामुळे आम्ही कोणाविषयी बोलतोय हे तुम्हांला कळलंच असेल. आम्ही बोलतोय अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्याविषयी. या नवीन जोडीचा आगामी प्रोजेक्ट कदाचित दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित करणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाविषयी अजून कोणत्याच गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही.

पण स्पृहा जोशीने नुकताच सोशल मिडीयावर तिचा, गश्मीर महाजनी आणि समीर विद्वांस यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केला आहे आणि स्पृहाने फोटोलो असे कॅप्शन दिले आहे- “फ्रेश टीमसोबत एक नवीन फ्रेश सुरुवात. २०१७चा पहिला प्रोजेक्ट आजपासून सुरु.”

स्पृहा, समीर आणि गश्मीर यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी http://www.marathidhamaal.com/ कडून खूप खूप शुभेच्छा!