आता ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ सिंगापूर

 

सोनल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाला महाराष्ट्रात तसेच भारतात रसिक प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उमेश कामत-स्पृहा जोशीची जोडी मालिकेमुळे एवढी लोकप्रिय झाली की त्यांचं एकत्र नाटक आल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’च्या प्रचंड यशानंतर १५ मे रोजी सिंगापूरमध्ये पहिला प्रयोग होणार आहे. रिफ्रेशिंग केमिस्ट्री पाहण्यासाठी सिंगापूरवासी पण नक्कीच आतुर असतील यात शंका नाही.  अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’या नाटकाचं लिखाण मिहिर राजदा यांनी केले आहे.  सिंगापूर रहिवाशींना पण उमेश कामत-स्पृहा जोशीची रंगमंचावरील केमिस्ट्री पाहण्याचा अनुभव मिळेल.