सुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर

 

मराठी अभिनेता सुबोध भावेसाठी हे वर्ष फारच व्यस्ततेचे होते. यावर्षी सुबोधचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 सिनेमे रिलीजच्य़ा वाटेवर होते. त्यापैकी काही रिलीज झाले असून काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे तर काहींचे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे. सुबोधने नुकताच फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे त्यात त्याने प्राजक्ता माळीसोबत प्रथमच स्क्रिन शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.

प्राजक्ता माळी मालिकांतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे तर सर्वगुणसंपन्न असा अभिनेता म्हणून सुबोधची ख्याती आहे. अशावेळी या दोघांची जोडी कशी जमून येते हे पाहणे औत्सुक्याचे राहील. अजून या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटासह अजून दोन असे सिनेमे आहेत ज्यांच्या प्रदर्शनची तारीख लवकरच समोर येईल.