सुयश टिळक आणि अक्षया देवधर खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत?

 

‘का रे दुरावा’ मधील जय उर्फ अभिनेता सुयश टिळकला सध्या त्याचं प्रेम मिळालं आहे असं वाटतंय. ही एक ओळ वाचल्यावर अनेकांनी त्याच्या अफेरविषयी चर्चा नक्कीच सुरु केल्या असतील ना? असो! पण अशीच एक इंटरेस्टिंग बातमी आम्ही तुम्हांला देणार आहोत. आम्हांला असं वाटतंय सुयश टिळक आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर एकमेकांना डेट करत आहेत.

इनस्टाग्राम फोटो : 

खरं तर सेलिब्रिटी, आपण सर्वच जण सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असतो. सोशल मिडीयावरील एकही गोष्ट चेक केल्याशिवाय आपला दिवस सरेना, अशी परिस्थिती सध्या अनेकांची झाली आहे. सुयश टिळक आणि अक्षया देवधरच्या सोशल मिडीयावरील पोस्ट पाहता ते दोघेही जरा जास्तच ऍक्टिव्ह आहेत असं दिसून येतंय. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असतो आणि सेलिब्रिटी पण हा हक्क बजावू शकतात. पण ते सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी जाणून घेण्याची पण आवड असते. त्यांच्यासाठीच ही आजची बातमी.

सुयश आणि अक्षयाच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट पाहता ते दोघे एकमेकांना खूपच मिस करत आहेत असं दिसून येतंय. आता खरोखरंच ते एकमेकांना डेट करत आहेत की ते फक्त ‘जस्ट फ्रेण्ड्स’ आहेत? खरं काय ते अजून माहित नाही. पण जर हे खरं असल्यास अनेकांची ‘चालतंय की’ अशी भावना नक्कीच असेल.