तेजश्री प्रधानच्या फॅन्ससाठी स्पेशल गिफ्ट

 

लाडकी जान्हवी कोणतं गिफ्ट देणार आहे, आपल्याला असा तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल. बरेच दिवस झाले, तिचं ‘काहीही हं श्री’ ऐकलेलं नाही .‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका संपल्यापासून सर्वांनाच चुकचूकल्यासारंखं वाटतंय. म्हणूनच जान्हवी फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या फॅन्ससाठी स्पेशल गिफ्च घेऊन आली आहे. आता ती मालिका आहे, नाटक की सिनेमा हे ओळखण्याची जबाबदारी तिने फॅन्सवर सोपवलीय.

ह्याबाबतचं  एक पोस्टर नुकतंच तिने सोशल मिडीयावर पोस्टर केलं आहे. तेव्हा लवकरच तेजश्री आपल्या फॅन्सच्या भेटीला येतेय. कोणत्या नव्या भूमिकेत ती आपल्याला दिसेल ह्याची सर्वत्र उत्सुकता आहे.