झी मराठीवर ‘उंच माझा झोका’ पुरस्कार

 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या अनेक महिला समाजात कार्यरत आहेत. प्रसिध्दीचा सोस न बाळगता अखंड काम करणा-या या महिलांचा गौरव झी मराठी वाहिनीच्या ‘उंच माझा झोका’ पुरस्काराने केला जातो.

कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरू

वात केली. यंदा या पुरस्काराचं तिसरं वर्ष आणि या वर्षी समाजकारण, शिक्षण, कला , क्रीडा,पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, साहित्य अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या दहा कर्तुत्वान महिलांचा गौरव करण्यात आला.

प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या पुरस्कारांचे निवेदन केले आहे. येत्या 13 सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. हा उंच माझा झोका पुरस्कार सोहळा झी मरठीवरून प्रसारित होणार आहे.