लैगिक छळाच्या बातम्यांमुळे मराठमोळी मॉडेल निकीता गोखले प्रसिध्दी माध्यमांवर संतापली

 

निकीता गोखले या मराठमोळ्या मॉडलेचा बालपणी झालेल्या लैंगिक छळाच्या बातम्यांनी अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांचे मथळे काही दिवसांपूर्वीच झळकले. शालेय जीवनात ट्युशन टिचरने केलेल्या बाललैगिक छळाच्या हेडलाईन्समुळे निकीता प्रसिध्दी माध्यमांवर चांगलीच संतापली आहे.

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला संताप व्यक्त करताना निकीता म्हणते, “मी सध्या माझ्या बाललैंगिक शोषणाच्या बातम्यांमुळे फार नाराज झाली आहे. ह्या बातम्या 2014 मध्ये यापूर्वीच प्रसारीत झाल्या होत्या. मी ही गोष्ट विसरायचा प्रयत्न करतेय. तरीसुध्दा तुम्ही सारखी सारखी ही बाब का पुन्हा उगाळताय, ह्याचा मला त्रास होत आहे. मला आता ह्याबाबत काहीही बोलायची इच्छा नाही. ज्यांना बाललैंगिक शोषणासारख्या प्रसंगातून जावं लागतं, त्यांनाच हे दु :ख कळतं.”

यापूर्वी प्लेबॉय मॅगझिनसाठी टेस्ट न्यूड फोटोशूट केल्यामुळे निकिता गोखले चर्चेत आली होती. प्लेबॉयचे फोटोग्राफर एरोल फ्रँकलिन यांनी निकिताला या फोटोशूटची ऑफर दिली होती.

मूळची नागपुरची निकिता हिने मिस इंडिया बिकिनी २०१५, मिस वर्ल्ड बिकिनी २०१५ स्पर्धेत भाग घेतला होता.