उर्मिला आणि आदिनाथ ‘आई-बाबा’ होणार?

 

जेव्हा आपण कलाकारांविषयी कोणतीही एखादी बातमी ऐकतो तेव्हा ती अधिक जाणून घेण्यासाठी नेहमीच तयार असतो. पण बातमी जर कलाकाराच्या आई-बाबा होण्याशी संबंधित असेल तर आपण जास्त उत्साही होतो आणि त्यावेळी त्यांच्या सध्याच्या हॅप्पी मूड्सचा आणि त्यांच्या येणा-या गोड बाळाचा विचार करतो.

आता शीर्षकावरुन तुम्हांला कळलेच असेल की आम्ही कोणाविषयी बोलणार आहोत. तर नुकतेच अभिनेत्री उर्मिला कोठारेने सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला सुंदर असे कॅप्शन पण दिले आहे. त्या कॅप्शनवरुन आणि फोटोवरुन आणि एकंदरीत उर्मिलाच्या फोटोवर येणा-या कमेंट्समुळे आम्हांला असं वाटतंय की जो विचार आम्ही करतोय तोच विचार तुम्ही देखील करताय.

अद्याप, कोठारे कुटुंबियांकडून अजून कोणत्याही गोष्टीचा खुलासा केलेला नाही. पण जर ही गोड बातमी खरी असेल तर उर्मिला आणि आदिनाथच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.