वरूण धवन थिरकणार मराठी गाण्यात

 

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि तरूणींचा लाडका अभिनेता वरूण धवन मराठी सिनेमांतील गाण्यावर थिरकतोय...ऐकून आश्चर्य वाटलं ना...अहो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या तालावर वरूण धवन मराठी सिनेमांतील गाण्यावर डान्स करतोय. ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘एबीसीडी – 2’मधून वरूणचे डान्सिंग स्किल्स आपण पाहिलेच आहे. आता इतर बॉलिवूडकरांप्रमाणे वरूणलाही मराठीची भुरळ पडलीय याबाबत शंका नाही.

टी. एल. व्ही. प्रसाद या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, अशोक सराफ आणि महेश मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परशुरामी आदी कलाकारही सिनेमांत पाहायला मिळतील.