काय? प्रार्थना बेहरे लवकरच लग्न करतेय?

 

सध्या आजूबाजूला अशी चर्चा रंगत आहे की देखणी आणि हुशार अभिनेत्री प्रार्थना बेहरे लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि असे देखील म्हटले जात आहे की येत्या नोव्हेंबरमध्ये प्रार्थना, अभिषेक या नावाच्या व्यक्तिशी विवाहबध्द होणार आहे.

अद्याप या गोष्टीचा उघडपणे खुलासा प्रार्थना बेहरेकडून झालेला नाही. पण जर ही रंगणारी चर्चा खरी असेल तर तिच्या मेल चाहत्यांसाठी ही नक्कीच वाईट बातमी ठरू शकते.

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत प्रार्थनाने अभिनय केला आहे आणि त्यामुळेच तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर फिदा असलेल्या चाहत्यांना नक्कीच या बातमीविषयी तपशीलात जाणून घ्यायची इच्छा झाली असेल.