पूनम शेंडे आणि गौरी खान यांच्यामध्ये नक्की काय शिजतंय?

 

वन ऑफ दि टॉप प्रॉडक्शन हाऊस ‘सारथी एंटरटेनमेंट’च्या डिरेक्टर पूनम शेंडे आणि  किंग खानची पत्नी गौरी खान यांचा सेल्फी सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या सेल्फी मागचे आणि भेटीमागील रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक जण नक्कीच उत्सुक असतील.

इंटिरिअर डिझायनर आणि निर्माती पूनम शेंडेच्या ‘सारथी एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन हाऊसने ‘पिंडदान’, ‘मॅटर’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि त्यांचा ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अगोदरच्या इतर चित्रपटांसारखे ‘जाऊद्यांना बाळासाहेब’  या चित्रपटाला पण प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळणार याची खात्री वाटते. 

पण सध्या गौरी खान आणि पूनम शेंडे यांच्या सेल्फीची चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपल्या मनोरंजनासाठी नक्कीच काहीतरी शिजतंय अशी १०१% खात्री व्यक्त केली जात असली तरी नक्की काय चाललं आहे हा मोठा प्रश्नचिन्ह तर आहेच राव!