Whoa! खरंच जितू आणि आमिर खान एकत्र काम करत आहेत?

 

कलाकारांच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर एक इंटरेस्टिंग पोस्ट पाहिली का? नसेल पाहिली तर काही हरकत नाही, आम्ही तुम्हांला सांगतो. मराठी इंडस्ट्रीचा मराठमोळा अभिनेता जितू उर्फ जितेंद्र जोशीने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. जितूच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते आणि मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्याच्या प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छाही देत आहेत.

जितेंद्र जोशीने या पोस्टला ‘तुफान आलंय... लवकरच’ असे कॅप्शन दिले आहे. काहीतरी नक्कीच इंटरेस्टिंग येणार हे मात्र नक्की आणि नेहमी सारखं या प्रोजेक्टमधून पण जितू सर्वांचं मन जिंकणार हे मात्र नक्की.