रमा-माधव अडकले लग्नबेडीत?

 

काय? रमा माधव…लग्नबेडीत अडकले...म्हणजे काय...त्यांचं तर यापूर्वीच लग्न झालं आहे. गोंधळलात ना...अहो, पण आम्ही इथे सांगतोय ते,ऑन स्क्रिन रमा-माधव या जोडीबद्दल. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा-माधव’ सिनेमातील रमा-माधव म्हणजेच अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे या दोघांचं नुकतंच शुभमंगल झाल्याची बातमी समजतेय. पर्ण आणि आलोक यांचा मित्र असलेला अभिनेता सुयश टिळकनं ही आनंदवार्ता सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली. परंतु याबाबतची सविस्तर माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. पर्ण आणि आलोक या दोघांनीसुध्दा प्रायोगिक रंगभूमीवर ब-याच नाटकांमधून एकत्र काम केलं आहे.  

‘रमा-माधव’ सिनेमाद्वारे दोघं प्रथमच सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र झळकले. ‘विहीर’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ मधून आलोकने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर पर्णची प्रमुख भूमिका असलेला ‘फोटोकॉपी’ सिनेमा लवकरच झळकतोय.

अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्ण पेठेला या आनंदांच्या बतमीनिमित्त मराठी धमाल डॉट कॉमतर्फे हार्दिक शुभेच्छा!