अमेय आणि शशांक का आले चर्चेत?

 

मराठी सिनेसृष्टीतले दोन चॉकलेट हिरो यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी चर्चेत आले. अभिनेते अमेय वाघ आणि शशांक केतकर या दोघांनीही सोशल मिडियावर नुकतेच काही फोटो शेयर केले आहे. सोशल मिडियावर या फोटोंमुळे नुसती चर्चाच जणू सुरू झाली.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम कैवल्य म्हणजेच अमेय आणि ‘कप सॉंग’ फेम मिथिला पालकर या दोघांचा अमेयने सोशल मिडियावर फोटो शेयर करून #मायव्हॅलेंटाईन असं कॅप्शन दिलं आहे. भा.डी.पा. यांचा भाग असलेल्या या दोघांच्या या फोटोमुळे त्यांच्या फॅन्सच्या भुवया फारच उंचावल्या आहे. तसंच काहीसं शशांक केतकर याच्या बाबतीत सुद्धा झालं.

‘होणार सून मी या घरची’ फेम श्री म्हणजेच शशांक याने दोन दिवसांपूर्वी एक फोटो शेयर केला होता. बरं एखाद्या कलाकारानी आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर काही फोटो शेयर केलं म्हणजे त्यांच्यात काही असेलच असं नाही ना. या दोघंच्या सोशल पोस्टमुळे खूप खळबळ उडाली आहे.

आता हे नक्की काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही.