का आली तेजश्री प्रधान चर्चेत?

 

बॉलिवूडमध्ये ब-याच गोष्टीची चर्चा होते आणि आता मराठीत पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन चर्चा सुरु होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. या शंकेच कारण आहे जान्हवी उर्फ अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शिल्पा नवलकर यांच्यामधील वाद. 

स्थळ- क्लिनिक - शिल्पा नवलकर आणि तेजश्री प्रधान यां दोघांमधील वाद सोशल मिडीयावर मांडण्यात आले होते. शिल्पा नवलकर यांनी  तेजश्री प्रधानच्या वागणुकीविषयी फेसबुकवर आपलं मत व्यक्त केले आणि त्यामुळे तेजश्री चर्चेचा विषय बनली.

“साडेअकाराची वेळ घेऊन मी एका व्यक्तीला भेटायला आले आहे. वेळेच्या दहा मिनिटे आधीच मी इथे पोहोचले. माझ्यामागून अभिनेत्री तेजश्री प्रधान आली आणि ती सरळ त्या व्यक्तीच्या केबीनमध्ये गेली. तिने रिसेप्शनिस्टकडून परवानगीही घेतली नाही किंवा तिच्या आधी कोणीतरी आले आहे, याची साधी दखलही घेतली नाही. वागण्या बोलण्याच्या या साध्या गोष्टी लोकांना कधी समजतील?”, अशी पोस्ट शिल्पा नवलकर फेसबुकवर केली होती. 

यावर तेजश्री प्रधान यांनी शिल्पा नवलकर यांना उत्तर कळविले आहे-

“मी माझ्या डाएटिशियनकडे गेले होते. अकराची वेळ घेतली होती. पण मला दहा- पंधरा मिनिटे उशीर होणार असल्याचे मी डॉक्टरला कळवले होते. मी तिथे पोहोचल्यावर मला शिल्पा भेटल्या. त्यांना मी हसून 'हाय' म्हटले आणि मी तिथे बसले. त्यानंतर एक पेशंट झाल्यावर डॉक्टरनेच मला बोलावलं. इतक्या साध्या घटनेचे अशा पद्धतीने केलेले वर्णन न पटणारे आहे” - तेजश्री प्रधान.