संजय जाधव यांच्या चित्रपटात अमृता-वैभवची केमिस्ट्री पाहायला मिळणार?

 

मराठी सिनेसृष्टी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहते.  मग तो चित्रपट असो किंवा एखादी मालिका. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नेहमी मेहनत घेत असतात, नवनवीन आशय, नवीन कलाकार किंवा नवीन जोड्या आदी. गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करत असतात. आता आणखी एक नवा चित्रपट नवीन प्रेमकथा फुलवायला तयार होणार आहे. ही प्रेमकथा आहे यावरुन तुम्ही ओळखलंच असेल की हा चित्रपट हमखास संजय जाधव दिग्दर्शित करणार.

बरोबर! संजय जाधव दिग्दर्शित एक मराठी चित्रपट लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण सध्या अशी चर्चा आहे की यावेळी संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या बाबतीत एक ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट म्हणजे त्यांच्या चित्रपटात एक फ्रेश जोडी दिसणार आहे. म्हणजेच अभिनय आणि नृत्यात अदाकारी दाखवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मराठीसह बॉलिवूडमध्ये पण आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनता वैभव तत्त्ववादी यांची जोडी संजय जाधव यांच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता हे कितपत खरं आहे ते लवकरच कळेल.

अद्याप या चित्रपटाशी संबंधित अजून कोणतीही बातमी बाहेर आलेली नाही, पण लवकरच संजय जाधव यांच्या चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना कळेल.