छोटा राजन चित्रपटात काम करणार?

 

हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन यांच्या आख्यायिकांवर/ दंतकथांवर आधारीत अगणित सिनेमे येऊन गेले. विशेष म्हणजे वास्तव्यातील या कुख्यात खलनायकाच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांना सिनेरसिकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे हिंदीच नव्हे तर मराठीतही असे सिनेमे येत आहे.

ऱ्हिदम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म आणि अनुसया एंटरप्रायजेस प्रस्तुत ‘राजन’ हा सिनेमा लवकरच मराठीच्या सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा कुख्यात अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित आहे.

मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार 'राजन' या चित्रपटामार्फत सिनेरसिकांना अनुभवायला मिळणार आहे. खास करून, छोटा राजन याच्या हयातीत त्याचा जीवनपट मराठीच्या पडद्यावर साकारण्याचा धाडस मराठीचा कोणता अभिनेता करत आहे? हे सध्या गुपितच आहे. 

याबद्दल सांगताना या सिनेमाचे लेखक तसेच दिग्दर्शक भरत सुनंदा सांगतात की, “आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची धडपड प्रत्येक माणूस करत असतो, समाजात आपली विशेष ओळख बनविण्यासाठी निर्धारित लक्ष्य गाठण्याचा अट्टाहास तो करतो, मात्र त्याची ही जिद्द कधी कधी त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते, आणि त्यातूनच त्याच्या आयुष्यात होत असलेले बदल मी कागदावर उतरवले.

राहुल गौतम सतदिवे, दर्शना सागर भांडगे, दिप्ती श्रीपत यांची निर्मिती आणि कल्याण शिवाजी कदम, धनुष खंडारे, हेमंत वामनशेठ पाटील यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा मराठीतील दर्जेदार सिनेमांच्या यादीत समाविष्ट होईल, यात शंका नाही.