खरंच ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा दुसरा पर्व येतोय?

 

झी मराठी वाहिनीवरील माजघर म्हणजे आशु, सुजय,कैवल्य,रेश्मा,मिनल आणि ऍना यांचं कल्ला करायचं ठिकाण. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील या कलाकारांनी प्रेक्षकांचं १०० टक्के मनोरंजन केलं आहे, त्यामुळे या पात्रांना पुन्हा कधी पाहतोय असं प्रत्येकांना झालंय. या मालिकेनंतर हे सर्व कलाकार कोणत्या ना कोणत्या प्रकल्पातून दिसत आहेत पण प्रेक्षकांना या पात्रांना माजघरांत पुन्हा एकदा पाहायचंय.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचा दुसरा पर्व येणार असे या मालिकेच्या टिमने सांगितले होते आणि आता असं समजा की आपल्याला लवकरच या मालिकेचा दुसरा पर्व लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण सध्या याच गोष्टीची चर्चा चालू आहे आणि असंही म्हंटलं जातंय की या नवीन पर्वात माजघरांतील मंडळींच्या संख्येत वाढ होणार आहे, म्हणजेच या अजून दोन नवीन पात्रं दुस-या पर्वात येणार आहेत. पण ते दोन नवीन कलाकार कोण याविषयी अजून काही सांगण्यात आलेले नाही. 

जर लवकरच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ चा दुसरा पर्व येतोय तर त्याचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर करणार असून गीतकार अभिषेक खणकर यासाठी संवाद लिहणार आहे. तसेच कथा आणि पटकथाची जबाबदारी लेखक सुदीप मोडक आणि अंबर हडप यांनी पेलली आहे, अशी देखील चर्चा होतेय.

आता हे कितपत खरंय हे वेळच सांगेल आणि जर खरंच असंच काही घडणार असेल तर आम्हां प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि खरं तर आम्हांला ‘टवका’ वाटेल.