जान्हवीच्या भावाचं लग्न होणार का?

 

झी मराठीवरील तुफान लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत सध्या जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या लग्नाचं प्रकरण चागंलच गाजतंय. पिंट्याचं लग्न मोठ्या श्रीमंत घरात व्हावं असं जान्हवीच्या आईचं स्वप्न आहे. पण बहुधा आता ते पूर्ण होऊ शकणार नाही, असंच दिसतंय. मालिकेत पिंट्यांची प्रेयसी सुनिताची एन्ट्री झालीय. सरळ – साधी सुनिता थेट घरीच पोहचल्याने मोठी अडचण निर्माण झालीय. जान्हवीच्या आईल्या हे समजल्याने ती प्रचंड संतापलीय. बाबासुध्दा फार रागावलेत. आता अशा परिस्थीतीत जान्हवीला पिंट्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती होती तरीही तिने याबाबत का सांगितलं नाही, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता पिट्यांचं लग्न होणार का, हे पाहण्यासाठी पाहा ‘होणार सून मी ह्या घरची’.