किंग ऑफ कॉमेडी आणि डान्सिंग क्विन एकत्र?

 

जेव्हा किंग ऑफ कॉमेडी आणि डान्सिंग क्विन एकत्र येऊन एखाद्या गाण्यावर थिरकतील तेव्हा प्रेक्षकांना कसला भन्नाट आनंद होईल ना... कलाकारांना कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमातून पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं,पण जेव्हा दोन कलाकार पहिल्यांदा एकत्र काम करत असतील तेव्हा ते जे काही सादर करणार आहेत त्याविषयी जाणून घ्यायला प्रत्येक प्रेक्षक उत्सुक असतो.

तर आज आम्ही अशाच कलाकारांविषयी सांगणार आहोत जे प्रथमच एकत्र येत आहेत आणि ते कलाकार आहेत किंग ऑफ कॉमेडी जॉनी लिव्हर आणि डान्सिंग क्विन मानसी नाईक.

हे दोन्ही कलाकार लवकरच ‘मला लगीन करायचंय’ या गाण्यावर एकत्र थिरकणार आहेत. मानसी नाईकच्या बाई वाड्यावर या या गाण्यातील दिलखेचक अदा पाहिल्यावर ‘मला लगीन करायचंय’ या गाण्यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच उत्सुक असू आणि या नवीन गाण्यात जॉनी लिव्हर यांची साथ मिळाली आहे म्हणजे तर क्या बात!

‘मला लगीन करायचंय’ या गाण्याला आदर्श शिंदे यांचा आवाज लाभला आहे तर या गाण्याचे संगीत दिग्दर्शन स्वरुप भलवनकर यांनी केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी आणि निर्मिती DID फेम सिध्दाशे पै याने केली आहे. या सर्व कलाकारांचा या गाण्यामध्ये मोलाचा वाटा असल्यामुळे या गाण्याची प्रतिक्षा अनेकांना असणार.