संजय, संस्कृती आणि प्रार्थना एकत्र?

 

संजय जाधव, संस्कृती बालगुडे आणि प्रार्थना बेहरे एकत्र? कशासाठी? हा प्रश्न जसा तुम्हांला पडला तसाच आम्हांला देखील पडला आहे.

मराठीतल्या होतकरू दिग्दर्शकांमध्ये आज अग्रगण्याने जे नाव घेतलं जातं ते म्हणजे संजय जाधव. संजय जाधव यांनी ‘चेकमेट’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’, ‘तू हि रे’ आणि ‘गुरू’ यांसारखे अनेक सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. त्यांच्या ‘दुनियादारी’ या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला. त्यांच्या या सिनेमामुळे ते घराघरांत जाऊन पोहोचले आहे. नेहमी कॅमे-याच्या मागे असलेले संजय जाधव आता कॅमे-यासमोर येणार आहेत. कॅमेरासमोर म्हणजे कसं तर आता संजय जाधव अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

लवकरच संजय जाधव यांच्याबरोबर मराठी सिनेसृष्टीतल्या दोन बोल्ड अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि संस्कृती बालगुडे एका चित्रपटांतून आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची सविस्तर माहिती गुलदस्त्यात असली तरी सिनेमाबाबत नवनवे अपडेट्स् जाणून घेण्यासाठी फॉलो करा http://www.marathidhamaal.com/. या तिघांना एकत्र पाहायला जसे आम्ही उत्सुक आहोत तसेच तुम्हीही असाल हे मात्र नक्की.