शाहीद कपूरचा भाऊ साकारणार का ‘परश्या’ची भूमिका?

 

काही दिवसां अगोदर आपण ऐकले होते की करण जोहर सैराटचा हिंदी रिमेक करणार आहे आणि याच्याशी संबंधित आणखी एका गोष्टीची चर्चा करण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे रिंकू राजगुरु उर्फ आर्चीची भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारणार. पण प्रेक्षकांचे प्रश्न आणि  उत्सुकता इथेच थांबत नाही तर त्यांना लगेच दुसरा प्रश्न असतो की मग हिरोची म्हणजेच परश्याची भूमिका कोण साकारणार? आता या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे. म्हणजे अजून ठामपणे सांगता येत नाही, पण शाहीद कपूरचा भाऊ इशान ‘परश्या’ची भूमिका साकारेल असा अंदाज बांधला जातोय.

असो! कोणतीही गोष्ट लपून राहत नाही आणि खास करुन प्रेक्षकांच्या मनोरंजनाची गोष्ट असेल तर मुळीच नाही. लवकरात लवकर कळेल आपल्याला पण इशान परश्याची भूमिका साकारणार की नाही ते.