करण जोहरच्या 'सैराट' रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी साकारणार 'आर्ची'ची भूमिका?

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने त्यांच्या यशामुळे बॉलिवूड आणि इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीला आकर्षित केलं आहे. विलक्षण प्रेमकथा मांडणा-या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं होतं. संपूर्ण भारतातील जनतेला ,कलाकारांना आणि परदेशवासीय प्रेक्षकांना पण वेड लावणारा एकमेव बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘सैराट’.

नुकतेच या सिनेमाचा हिंदी रिमेक करण जोहर करणार असल्याची बातमी ऐकण्यात आली आहे. आता तुम्ही विचार कराल हिंदीत सैराट..मग कलाकार कोण? अहो दुसरी तिसरी कोण नसून श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर या सिनेमातून सिनेक्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिची काहीशी झलक तुमच्यासाठी :

झी स्टुडियोज बरोबर धर्मा प्रॉडक्शन हे या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सध्या तरी सिनेमाच्या कथेवर काम चालले असले तरी २०१७ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.