देसी गर्लच्या मराठी सिनेमात 116 कलाकारांची मांदियाळी

 

बॉलीवूडची देसी गर्ल बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पहिल्या-वहिल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. प्रियांकाचं पर्पल पेबर पिक्चर्स (PPP) हे प्रोडक्शन हाऊस ह्या मराठी सिनेमाची निर्मिती करतेय. पिगी चॉप्सच्या ह्या मराठी सिनेमात एक नाही दोन नाही तर तब्बल 116 कलाकारांची मादियांळी असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे ह्या कलाकारांच्या भूमिकेकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे.

आता पाहूया, बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणा-या प्रियांका चा हा मराठी सिनेमा आपल्या प्रेक्षकांना किती भावतोय.