जाणून घ्या, तेजस्विनी पंडीतचे हॉलिडे प्लॅन्स

 

सामान्यांपेक्षा सेलिब्रिटींचे शेड्यूल खुप बिझी असतं. कामाच्या अजब वेळा सांभाळत त्यांना एकप्रकारची तारेवरची कसरतच करावी लागते. म्हणून त्यांना एक मोठा ब्रेक घेऊन मस्त सुट्टी एन्जॉय करणं मस्ट आहे. गुलाबची कळी फेम अभिनेत्री म्हणजेच तेजस्विनी पंडीतने एक हॉलिडे प्लॅन केला आहे.

‘तू ही रे’,‘7 रोशन व्हिला’ आणि ‘तिचा उंबरठा’ या सुपरहीट सिनेमांनंतर तेजस्विनी मॅडमनी दीड महिन्यांची मोठी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुट्टी ती कुटूंबियांसोबत रिलॅक्स करणार असून परदेशात ती हॉलिडेसाठी जाणार आहे. आगामी प्रोजेक्टसवर काम करण्यापूर्वी फ्रेश होऊन बॅक टू वर्क करण्याचा तिचा मानस सफळ संपूर्ण होवो, ही सदिच्छा.

मराठी धमाल डॉट कॉमतर्फे अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला ‘हॅप्पी हॉलिडे’ !