केतकीला मिळालं सरप्राईझ गिफ्ट

 

अभिनेत्री-गायिका केतकी माटेगांवकरला नुकतचं एक सरप्राईझ गिफ्ट मिळालं आहे. ‘फुंतरू’ या आगामी सिनेमात केतकी प्रमुख भूमिका साकरतेय. या सिनेमाच्या सेटवर तिच्यासाठी एक सरप्राईझ गिफ्ट आलं आणि ते म्हणजे अॅपलचा लॅपटॉप. हे गिफ्ट पाहून केतकी खूप आश्चर्यचकीत झाली. ती प्रचंड गॅझेटप्रेमी आहे आणि तिच्या लाडक्या आई-बाबांनी तिच्यासाठी हे खास गिफ्ट पाठवल्याने तर केतकीचा आनंद गगनात मावत नव्हता.

सुजय डहाके दिग्दर्शित ‘फुंतरू’ हा सिनेमा एक सायन्स फिक्शन म्हणजेच विज्ञानावर आधारित कथा आहे. केतकीने या प्रमुख भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलीय. सिनेमातील हटके अंदाज साकारण्यासाठी तिने चक्क सहा किलो वजन वाढवलंय. तेव्हा, सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तिची ही मेहनत किती फळाला येते हे कळेलच.