स्पृहा जोशी देणार सरप्राईजेस

 

ती अभिनेत्री तर आहेच, पण एक उत्तम कवियत्री आणि गीतकार म्हणूनही तेवढीच प्रसिध्द आहे... अगदी बरोबर ओळखलं आम्ही सांगतोय,अभिनेत्री स्पृहा जोशीबद्दल. तुम्ही म्हणाल, यात नवं काय आहे. नुकतंच तिनं सोशल नेटवर्किंग साईटवर ऑक्टोबरमध्ये आपला वाढदिवस येत असून सर्वांनी भरपूर सरप्राईजेससाठी तयार राहण्यास सांगितंलय.

‘अग्निहोत्र’तील अॅडव्होकेट उमा, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’मधील इशा, समुद्रतील नंदिनी किंवा ‘उंच माझा झोका’तील रमा असो, अशा अनेक नानाविविध भूमिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी स्पृहा जोशी फक्त अभिनयच नाही तर ‘लोपामुद्रा’ हा काव्यसंग्रह व ‘किती सांगायचंय मला..’ हे हद्यस्पर्शी गीत आपल्या लेखणीतून साकारते. त्यामुळे प्रेक्षकांना आणि आपल्या फॅन्सना ती नवं काय देणार याची सर्वत्र उत्सुकता आहे.