तुम्हाला माहीत आहे का मितालीच्या टॅटूमागील रहस्य?

 

सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना टॅटूचा खूप जास्त क्रेझ आहे. नव-नवीन डिझाइन्स  किंवा नाव लिहिलेला टॅटू करण्याचा जणू काही ट्रेंडच सध्या सिनेसृष्टीत सुरु झालेला आहे

.

नुकताच फ्रेशर्स मालिकेतील मिताली मयेकर हिने आणखी एक टॅटू काढला आहे. टॅटू हि अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती सोबत आयुष्यभर राहते आणि फक्त हौस म्हणून नाही तर तो टॅटू काढण्यामागे काही तरी अर्थ असला पाहिजे अशा मताच्या मितालीने लॅब्रा डॉगचा टॅटू काढला आहे

.

मितालीला कुत्र्यांची फार आवड आहे, त्यात तिच्याकडे डोरा नावाचा एक लॅब सुद्धा आहे. तिला एकदातरी कुत्र्याचा टॅटू काढायचा होता, म्हणून डोरासारखा दिसणारा अणि सोशल मिडियावरून काही डिझाईनस् मॅच करून तिने हा टॅटू काढला आहे. याअगोदर तिने तिच्या डाव्या हातावर ‘Always’ असा एक टॅटू काढला होता. तिला हॅरी पॉटर प्रचंड आवडतो आणि तो ‘Always’ तिच्या बरोबर असावा म्हणून तिने तो टॅटू काढला होता.

टॅटू ही अशा गोष्ट आहे की, ती आयुष्यभर आपल्याबरोबर असते, आणि आपल्याला आवडणा-या गोष्टी जर आपण टॅटू करून ठेवल्यातर काय मस्त ना... असं मिताली मयेकर आमच्याशी बोलताना म्हणाली. मितालीने काढलेल्या या टॅटूला आम्हां प्रेक्षकांकडून अनेक लाईक्स

!!