बघतोस काय मुजरा कर

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 3-2-2017

दिग्दर्शक : हेमंत ढोमे

निर्माता : गोपाल पाटील आणि वैष्णवी जाधव

निर्मितीसंस्था : इव्हरेस्ट इंटरटेनमेंट आणि गणराज प्रॉडक्शन

कलाकार : जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, रसिका सुनिल, नेहा जोशी

कथा : हेमंत ढोमे

संकलन: फैझल - इमरान

संगीत दिग्दर्शक : अमितराज

गीतकार : क्षितीज पटवर्धन

छायाचित्रण : मिलिंद जोग

पब्लिक रिलेशन : लीड मिडिया

कथानक : ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या नावावरुन लगेच लक्षात येते की हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार किंवा त्यांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करुन सध्याच्या पिढीला मार्गदर्शन करणारा असावा. “महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे आपण? जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं?” असे कित्येक