जाऊ द्या ना बाळासाहेब

 

सेन्सॉर: U

प्रदर्शनाची तारीख: 7-10-2016

दिग्दर्शक : गिरीश पांडुरंग कुलकर्णी

निर्माता : सागा निर्मित

निर्मितीसंस्था : झी स्टुडिओज प्रस्तुत

कलाकार : गिरीश कुलकर्णी, मोहन जोशी, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी

कथा : गिरीश पांडुरंग कुलकर्णी

पटकथा : गिरीश पांडुरंग कुलकर्णी

संवांद : गिरीश पांडुरंग कुलकर्णी

संगीत दिग्दर्शक : अजय-अतुल

गायक : अजय-अतुल

कथानक : झी स्टुडिओज प्रस्तुत, सागा निर्मित आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याविषयीची कमालीची उत्सुकता सिने रसिक आणि सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी स्वरुपात भाष्य करण्यात आलेल्या या चित्रपटाचं टिझर मोशन पोस्टर नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. अनोख्या वेशात आणि भलत्याच जोशात, झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्यांना जागं करायला येतोय ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ असं वक्तव्य करत सोशल मिडीयावर