या व्हिडीयोला ’१५ लाख’ व्ह्युज म्हणजे अश्विनी भावेंसाठी एक सरप्राईजच

 

२३ सप्टेंबर २०१७ रोजी ‘अशी ही बनवाबनवी’ ह्या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण झाली. १९८८ साली २३ सप्टेंबर रोजीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अर्थात प्रेक्षकांनी 'अशी हि बनवाबनवी'ला  जो काही उदंड प्रतिसाद  तो आपण आजही ह्याची देही ह्याची डोळा पाहत आहोत. अगदी आजच्या पिढीला देखील ह्या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत. विशेष म्हणजे त्यातला लिंबू कलरच्या साडीचा किस्सा तर सर्वांच्याच आवडीचा आहे. अश्विनी भावे आणि अशोक सराफ या दोघांचा तो सीन आजही आपण आवडीने पाहतो.

'अशी ही बनवाबनावी ची २९ वर्षे' हे निमित्त साधून अश्विनी भावे यांनी आपल्या फेसबुक पेज वर चित्रपटातल्या काही सीन्सना एकत्र करून एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. अवघ्या एक दिवसात ह्या व्हिडीओला १५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. लोकांचं हे प्रेम पाहून अश्विनी भावेना देखील आश्चर्य वाटलं. आजही लोकं लिंबू कलरची साडी,  माधुरी आणि धनंजय माने या पात्रांमध्ये अगदी सहज मिसळून जातायंत हे पाहून अश्विनीजीना ही नवल वाटलं.

विशेष म्हणजे आताची पिढी देखील हा चित्रपट आनंदाने पुन्हा पुन्हा पाहते, ह्याचं अश्विनीजीना खास कौतुक वाटलं. आजही हा चित्रपट जेवढा मागच्या पिढीचा तेवढाच आजच्या पिढीचा आहे हे इथे पाहायला मिळतंय.