पहा अभिनय सावंतच्या साखरपुड्याचे फोटोज...

 

महाराष्ट्राच्या लाडक्या हास्य विनोदी कलाकार निर्मिती सावंत ह्यांच्या मुलाचा म्हणजेच अभिनय सावंतचा काल साखरपुडा झाला. अभिनय सध्या झी मराठी वरील नकटीच्या लग्नाला यायचं हा’ ह्या मालिकेत नुपूर म्हणजेच प्राजक्ता माळीच्या भावाची भूमिका करत आहे. पूर्वा पंडित ह्या त्याच्या मैत्रिणीशी अभिनयने साखरपुडा केला आहे. पूर्वा हि सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे.

ह्या साखरपुड्याला निर्मिती सावंतची जवळची मैत्रीण रेणुका शहाणेह्या आल्या होत्या. तसेच तेजस्विनी पंडित, भार्गवी चिरमुले, आदेश बांधेकर, सुचित्रा बांधेकर ह्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

हा साखरपुडा शनिवारी २८ ऑक्टोबर ल मुंबईत पार पडला.