‘दिल दोस्ती...’ नंतर पुष्कराज चिरपुटकरचा ‘बापजन्म’

 

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसां अगोदर निपुण मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे यासंबंधित माहिती बाहेर आली होती त्यानंतर चित्रपटाचे नाव, चित्रपटातील प्रमुख चेहरा म्हणजेच सचिन खेडेकर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार हे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आले. आता तर या चित्रपटाशी संबंधित आणखी एक इंटरेस्टिंग गोष्टीचा उलगडा सोशल मिडीयावर करण्यात आला आहे.

http://www.marathidhamaal.com/news/teaser-poster-of-baapjanma-is-out

नुकतेच ‘बापजन्म’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे आणि सचिन खेडेकर यांच्यासह आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

http://www.marathidhamaal.com/news/sachin-khedekar-is-the-first-face-of-baapjanma

झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील आशू आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ मधील पप्या या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनसोक्तपणे मनोरंजन केले आहे. तसेच भारतीय डिजीटल पार्टीच्या ‘आपल्या बापाचा रस्ता’ या वेब सिरीजमध्ये पण तो झळकला होता. ‘बुधिया सिंग बॉर्न टू रन’ या हिंदी चित्रपटात आणि ‘टीटीएमएम’ या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी केली आहे. सचिन खेडेकर यांची ‘बापजन्म’ चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना १५ सप्टेंबर २०१७ अनुभवयाला मिळणार आहे.