ऐश्वर्या राय बच्चनच्या उपस्थितीत पार पडला ‘हृदयांतर’चा संगीत प्रकाशन सोहळा

 

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा बॉलिवूडमधील अभिनेता हृतिक रोशनच्या हस्ते पार पडला.

तर नुकताच आयोजित करण्यात आलेला या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा क्विन ऑफ बॉलिवूड ऐश्वर्या राय बच्चनच्या उपस्थितीत पार पडला. सोशल मिडीयावर, मित्र-नातेवाईकांमध्ये ‘हृदयांतर’ चित्रपटाच्या ट्रेलरची वाहवा करण्यात आली. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रत्येकाला नकळतपणे हळवे नक्कीच केले असेल. आता या चित्रपटातील गाणी पण तुमचे मन नक्कीच जिंकेल याची खात्री वाटते. 

जेव्हा विक्रम फडणीस यांनी ऐश्वर्या राय बच्चनला ‘हृदयांतर’च्या संगीत प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती दर्शविण्यास सुचविले तेव्हा ऐश्वर्यानी त्यांना लगेच होकार देऊन ‘हृदयांतर’ टीमचा एक भाग बनली. विक्रम फडणीस आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी अनेक प्रोजेरक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे. 

‘हृदयांतर’ विषयी ऐश्वर्या राय बच्चन म्हणते, “‘हृदयांतर’ हा एक प्रवास आहे...आयुष्य सेलिब्रेट करण्याचा. पण त्याचसोबत मी या चित्रपटाला एक सुंदर, संवेदनशील आणि भावनात्मक प्रवास मानते. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याचा मला हिस्सा बनायला मिळाला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

विक्रम फडणीस म्हणतात, “‘हृदयांतर’ चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात होण्यापासूनच संगीत हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. ऐश्वर्याने संगीच लाँच करणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. कित्येक वर्ष मी ऐश्वर्यासोबत काम करत आहे. काही नाती ही फॅशन डिझायनिंगपेक्षा जास्त महत्त्वाची असतात. त्यापैकी ऐश्वर्या एक आहे, जिचा मी नेहमी सम्मान करतो आणि ती माझी चांगली मैत्रीण देखील आहे. तिच्या हस्ते संगीत प्रकाशन म्हणजे हा माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण असेल.”

गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या, आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेतहा चित्रपट  जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.