मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सराला’ झाली १० वर्ष पुर्ण..

 

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात सुंदर अप्सरा सोनाली कुलकर्णीने आज चित्रपटाच्या दुनियेत आपली यशस्वी १० वर्ष पूर्ण केली आहे. १० वर्षांपूर्वी ह्याच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी तिचा पहिला चित्रपट “बकुला नामदेव घोटाळे” प्रदर्शित झाला होता. गेल्या १० वर्षात सोनाली हिने पुष्कळ यशस्वी चित्रपटान मध्ये काम केले आहे.

घार्या डोळ्यांची हि नायिका “नटरंग” ह्या चित्रपटनंतर खर्या अर्थाने कारकीर्दीस आली. ह्या चित्रपटातील “अप्सरा आली” हे गाण प्रेक्षकांना बरच आवडलं होत. तिचे काही चाहते तिला “अप्सरा” ह्या नावाने हाक मारीत. त्या नंतर अजिंठा, झपाटलेला २, क्लासमेट, मितवा आणि पोस्टर गर्लहि तिची यशस्वी चित्रपटांची नाव आहे. मराठी सिनेसृष्टी बरोबरच सोनाली हिने आपला ठसा हिंदी चित्रपटसृष्टीतही उमटवला आहे. सिंघम २ आणि मस्ती २ मध्ये तिने काम केले आहे.

सोनाली हिने तिच्या कॅरिअरची सुरुवात नृत्य विषयक चित्रपटापासून केली पण आता सध्या ती ते सगळ थांबवून फक्त अभिनयावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा “हम्पी” हा चित्रपट लाव्केरच प्रदर्शित होणार आहे ह्यातील तिची केसांची स्टाईल प्रेक्षकांना खूपच आवडलेली दिसतेय.

सोनाली हिने तिचा आनंद ट्वीटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे.

 सिनेसृष्टीत १० वर्ष यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन. पुढील सिनेमे व वर्ष हे भरभराटीचे जावो. हम्पी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा​