अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे एकत्र काम करणार

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटया सिनेमाने २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. बरं इतकच नाही तर, या सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भरभरून यश मिळविले आहे. या सिनेमातील रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावले आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली या सिनेमातील गाणीदेखील आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. म्हणूनच बॉलिवूडमधील कलाकार पण या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. या सिनेमाचा मोह बॉलिवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नाही.

अमिताभजी यांनी देखील सोशल मीडियावरून या सिनेमाचे कौतुक केले आणि आनंदाची बातमी म्हणजे नागराज मंजुळे यांच्या आगामी हिंदी सिनेमात बिग बी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  ते कसे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना? नागराज मंजुळे सध्या एका हिंदी सिनेमामध्ये व्यस्त असल्याचे कळते. आता हा सिनेमा नेमका कोणता या गोष्टीचा खुलासा लवकरच केला जाईल. पण सिनेमात खुद्द बिग बी काम करत असून नागराज आणि बिग बी पहिल्यांदाच एकत्र काम करत करणार आहे असे बोलले जात आहे.

नागराज मंजुळे यांनी हल्लीच एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी अमिताभजींविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत-