झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात रंगतदार परफॉर्मन्स.

 

झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात रंगतदार परफॉर्मन्स.

झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्याची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली.

तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोड्यांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिका-शनाया, भानू-शोभा मधील टशन दाखवणा-या डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.

एकंदरीतच, धम्माल मजा मस्तीने रंगलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०१७’ चा हा शानदार सोहळा बघायला विसरु नका येत्या १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडीवर.