सुप्रसिध्द ऑन स्क्रिन ‘बाबा आणि पाल्या’च्या जोड्या

 

शिस्तप्रिय, प्रेमळ, आईची पण भूमिका बजावणारा, आधारस्तंभ, मित्र अशा अनेक प्रेमांच्या शब्दांतून स्वत:चं अस्तित्व जगणारी व्यक्ती म्हणजे ‘बाबा’. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही हक्काचा मित्र असलेला बाबा, वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार शिस्त लावणारा आणि तितकेच प्रेमाने समजवणारा बाबा हा सगळ्यांसाठी नेहमीच खास असतो. आता येणा-या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने प्रत्येक पाल्याला त्याच्या बाबाविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.

ज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे बाबाची जागा पण कोणी घेऊ शकत नाही. ठेच लागल्यास पहिला शब्द जरी ‘आई गं’ असा आला तरी देखील आईसारखी काळजी बाबा पण करत असतात. ज्याच्या मार्गदर्शनातून आपण घडत असतो त्या प्रत्येक ‘बाबांना’ हॅप्पी ‘फादर्स डे’.

आपल्या आवडत्या कलाकारांच्या बाबांना आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहिले आहे. आज या लेखाच्या माध्यमातून तुम्हांला ऑन स्क्रिन गाजलेल्या बाबा आणि पाल्याच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत.

अशा अनेक लोकप्रिय ठरलेल्या जोड्या आहेत ज्यांनी ऑन स्क्रिन साकारलेल्या बाबा आणि पाल्य या भूमिकेने प्रेक्षकांना इमोशनल केले आहे. त्यापैकी काही जोड्यांची निवड आम्ही यामध्ये केली आहे. या जोड्या पाहून नक्कीच त्यांच्या भूमिका तुमच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील.

विनय आपटे आणि मुक्ता बर्वे (एका लग्नाची दुसरी गोष्ट)-

शरद पोंक्षे आणि मधुरा देशपांडे (असे हे कन्यादान)-

नाना पाटेकर आणि मृण्मयी देशपांडे (नटसम्राट)-

सतीश आळेकर आणि आशुतोष गोवारीकर (व्हेंटिलेटर)-

प्रशांत दामले आणि स्वप्नील जोशी (मुंबई-पुणे-मुंबई २)-

मोहन जोशी आणि सायली संजीव (काहे दिया परदेस)-

दिलीप प्रभावळकर आणि सई ताम्हणकर (फॅमिली कट्टा)-

सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर (एकुलती एक)-

वैभव मांगले आणि प्रिया बापट (टाईमपास २)-

डॉ. गिरीश ओक आणि ललित प्रभाकर (जुळून येती रेशीमगाठी)-

सुबोध भावे आणि तृषनिका शिंदे-निष्ठा वैद्य (हृदयांतर)-

सचिन खेडेकर आणि अमेय वाघ (मुरंबा)-