गश्मीरने शेअर केला त्याचा मुलासोबतचा UNSEEN फोटो

 

‘फादर्स डे’च्या दिवशी एकिकडे सर्व सेलिब्रिटी आपल्या वडिलांसोबतचे आपले फोटो सोशल मिडियावरून शेअर करत असताना मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने मात्र सोशल मिडीयावरून आपल्या मुलासोबतचा आपला फोटो शेअर केला.

गश्मीर महाजनीला मुलगा असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसोबतच मिडीयालाही माहित नव्हती. त्यामुळे रविवारी दिवसभर मराठी सोशल मिडीया गाजला तो गश्मीरच्या ह्या ट्विटमुळे. अनेक तरूणींना त्याचा हा फोटो पाहून चांगलाच धक्का बसला आहे, हे त्याच्या ट्विटरवरून गश्मीरला दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होतं.

गश्मीर सोशल मिडीयाव्दारे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “तुझ्यासोबत घालवलेल्या त्या क्षणांनी मला वडिल होण्याचं महत्त्व आणि त्यातली ममता शिकवली. तुला आज मिस करतोय, बाळा.”


आतापर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या ‘मॅचोमॅन’ची इमेज असलेल्या गश्मीरमधला ‘बाबा’ ह्या फोटोमुळे सगळ्यांच्या समोर आला.